Sunday, May 24, 2009

थोड्स कंप्यूटर विषयी ...

मी काल ऑफिस मध्ये आल्यावर ईश्वर भाईंनी मला हाक मारली. त्यांच्या कंप्यूटर मध्ये व्हायरस आला होता. तो काढण्यासाठी ते माझी वाट बघत होते. त्यांना मदत करताना माझा लक्षात आलं की, बर्‍याच वेळेला आपण आपल्या कंप्यूटरची योग्य काळजी घेत नाही. त्यामुळे असे अडचणीचे क्षण आपल्या समोर येतात म्हणून मी काही टिप्स खाली देत आहे. मला वाटतं तुम्हाला त्यांचा उपयोग होईल.

* समजा, तुमच्या कम्प्युटरवर एका वेळेला चार-पाच प्रोग्राम सुरू असतील आणि तुम्हाला डेस्कटॉपवर सेव केलेली एखादी फाइल उघडायची आहे। अशा वेळी आपण प्रत्येक प्रोग्राम मिनीमाइज करत बसतो। असा एकेक प्रत्येक प्रोग्राम मिनीमाइज करण्यापेक्षा सरळ 'विण्डोज लोगो असलेलं बटण आणि एम' एकत्र दाबायचं. सर्व प्रोग्राम मिनीमाइज होऊन आपण डेस्कटॉपवर येतो. तसंच 'विण्डोज लोगो असलेलं बटण आणि डी'दाबूनही थेट डेस्कटॉपवर येता येतं.

* अनेकदा काम सुरू असताना आपल्याला एखादी फाइल शोधायची असते. अशा वेळी स्टार्टमधून सर्चमध्ये जाण्याऐवजी थेट 'विण्डोज बटण आणि एफ' दाबल्यास थेट सर्च विण्डो ओपन होते.

* काही वेळासाठी ब्रेक घेण्यासाठी आपण सुरू असेलेले प्रोग्राम तसंच ठेवून जातो. यामुळे कदाचित एखाद्याने त्यात ढवळाढवळ केल्यास आपल्या कामावर पाणी पडू शकते. यासाठी आपली स्क्रीन लॉक करून जाणं हिताचं ठरतं. यासाठी फक्त'विण्डोज बटण आणि एल' दोन बटणं दाबण्याचा अवकाश आपली स्क्रीन लॉक होते. यात आपल्याला पासवर्डही सेट करता येतो. त्यामुळे आपलं काम इतरांना कळू न देण्यासाठीही याचा उपयोग होतो.

* त्याच बरोबर आपल्या कम्प्युटरमधल्या टेंपररी फाईल डिलीट करणं खुप गरजेचं असतं. त्यासाठी 'विण्डोज बटण आणि एफ' दाबुन थेट सर्च विण्डो ओपन करावी. नंतर *.tmp टाईप करा. येणार्‍या फाईल डिलीट करा. यामुळे कम्प्युटरमधील नको असलेल्या फाईल काढून टाकून जागा मोकळी करता येते.