इंटरनेट माध्यमाची  पोहोच गेल्या पाच वर्षांत झपाट्याने वाढली आहे. स्वाभाविकपणे या माध्यमाचा  संवादासाठी वापर वाढला आहे. केवळ मोठ्या शहरांपुरते इंटरनेट मर्यादित  राहिलेले नाही. ते लहान-लहान शहरांमध्येही विस्तारते आहे. ब्लॉगींग, ई  मेल्स, सोशल नेटवर्किंगपासून ते कार्यालयीन उपयोगापर्यंत अनेक पातळीवर  इंटरनेट वापरले जात आहे. विशेषतः ब्लॉगींग, सोशल नेटवर्किंग हा प्रकार  तरूणाईमध्ये चांगला रुजतो आहे. मराठीतही याच काळात ब्लॉगींगचा वापर मोठ्या  प्रमाणावर होतो आहे. रोज नवे नवे ब्लॉग्ज् तयार होत आहेत. अशा वेळी,  जाणतेपणाने अथवा अजाणतेपणी कॉपी राईट, बौद्धिक संपदा हक्क (इंटेलेक्च्युअल  प्रॉपर्टी राईटस्), सायबर कायदे यांचे उल्लंघन होण्याचे प्रकारही घडू  लागले आहेत. 
इंटरनेट वाढीच्या अवस्थेत असतानाच याबद्दल जागृती होणे  महत्वाचे आहे. हाच उद्देश ठेवून सकाळ माध्यम समुहाने शनिवारी (ता. 4  सप्टेंबर) ब्लॉगर्स आणि तज्ज्ञांचा संवाद व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घडवून  आणला. मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, नागपूर आणि  जळगाव या शहरांमधील "सकाळ' कार्यालयांमध्ये जमलेल्या ब्लॉगर्सना मुंबईहून 
सायबर  गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संजय जाधव आणि पुण्याहून कॉपी राइट  क्षेत्रातील ऍड. सारंग खाडिलकर, बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर) क्षेत्रातील  ऍड. मंगेश काळे यांनी मार्गदर्शन केले. ब्लॉगर्स आणि तज्ज्ञांमधील संवाद दोन तास चालला. या चर्चेचा सारांश प्रश्नोत्तरे स्वरुपातः
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा : 
eSakal