Sunday, July 19, 2009

थोड्स कंप्यूटर विषयी ...भाग 2

  • रन कमाण्डमधे जाऊन आपण अनेक प्रोग्राम रन करतो। त्यासाठी स्टार्ट-रन असा लाँगकट वापरण्यापेक्षा फक्त विण्डोज बटण आणि आर दाबायचं की, रनची विण्डो उघडते.
  • जो डेटा आपल्यासाठी मस्ट आहे, त्याचा बॅकअप ठेवावा. त्यासाठी तो एकाच ठिकाणी न ठेवता हार्डडिस्क, सीडी, पेन ड्राइव अशा वेगवेगळ्या ठिकाणी सेव करता येतो.
  • महत्त्वाचा डेटा अर्थात, वर्ड, एक्सेल, प्रेझेण्टेशन, गाणी, गेम्स, सिनेमा यांच्या फाइल्सपैकी ज्या फाइल आवश्यक आहेत तेवढ्याच 'हार्डडिस्क'मधे ठेवा. बाकीच्या फाइल सरळ डिलिट करा. नको असलेले प्रोग्राम काढून टाका. यामुळे व्हायरसची शक्यता कमी होते.
  • ज्या फाइल हव्या आहेत, पण कधीतरीच वापरणार, त्या सीडी, डीव्हीडी, पेन ड्राइव किंवा एक्स्टर्नल हार्डडिस्कमधे टाकून ठेवा.
  • मदतीने आपण एखाद्या र्सव्हरवर डेटा सुरक्षित ठेवू शकतो त्यासाठी 'गुगल डॉक्स' ही सेवा वापरता येईल. आपल्या जीमेल पासवर्ड वापरून जगाच्या पाठीवर कुठेही इण्टरनेटच्या मदतीने 'गुगल डॉक्स'मधे डेटा स्टोअर करता येतो.
  • डेटा कम्युटरवर ठेवायचा आहे, त्याची व्यवस्थित विभागणी करा. त्यासाठी सी ड्राइवमधे पाटिर्शन करून किमान आणखी एक ड्राइव तयार करा. त्याला नाव द्या. 'सी'मधे प्रोग्राम आणि बाकीचा डेटा फाइल पाटिर्शन करून नव्याने तयार केलेल्या ड्राइवमधे टाका. त्यामुळे हार्ड डिस्क क्रॅश झाली अथवा काही कारणामुळे फॉरमॅट करावी लागली, तर फक्त नव्याने प्रोग्राम इन्स्टॉल करावे लागतील. तुमच्या डेटाचं नुकसान होणार नाही.

19th July Contract Letter Meeting

Posted by Picasa

Sunday, May 24, 2009

थोड्स कंप्यूटर विषयी ...

मी काल ऑफिस मध्ये आल्यावर ईश्वर भाईंनी मला हाक मारली. त्यांच्या कंप्यूटर मध्ये व्हायरस आला होता. तो काढण्यासाठी ते माझी वाट बघत होते. त्यांना मदत करताना माझा लक्षात आलं की, बर्‍याच वेळेला आपण आपल्या कंप्यूटरची योग्य काळजी घेत नाही. त्यामुळे असे अडचणीचे क्षण आपल्या समोर येतात म्हणून मी काही टिप्स खाली देत आहे. मला वाटतं तुम्हाला त्यांचा उपयोग होईल.

* समजा, तुमच्या कम्प्युटरवर एका वेळेला चार-पाच प्रोग्राम सुरू असतील आणि तुम्हाला डेस्कटॉपवर सेव केलेली एखादी फाइल उघडायची आहे। अशा वेळी आपण प्रत्येक प्रोग्राम मिनीमाइज करत बसतो। असा एकेक प्रत्येक प्रोग्राम मिनीमाइज करण्यापेक्षा सरळ 'विण्डोज लोगो असलेलं बटण आणि एम' एकत्र दाबायचं. सर्व प्रोग्राम मिनीमाइज होऊन आपण डेस्कटॉपवर येतो. तसंच 'विण्डोज लोगो असलेलं बटण आणि डी'दाबूनही थेट डेस्कटॉपवर येता येतं.

* अनेकदा काम सुरू असताना आपल्याला एखादी फाइल शोधायची असते. अशा वेळी स्टार्टमधून सर्चमध्ये जाण्याऐवजी थेट 'विण्डोज बटण आणि एफ' दाबल्यास थेट सर्च विण्डो ओपन होते.

* काही वेळासाठी ब्रेक घेण्यासाठी आपण सुरू असेलेले प्रोग्राम तसंच ठेवून जातो. यामुळे कदाचित एखाद्याने त्यात ढवळाढवळ केल्यास आपल्या कामावर पाणी पडू शकते. यासाठी आपली स्क्रीन लॉक करून जाणं हिताचं ठरतं. यासाठी फक्त'विण्डोज बटण आणि एल' दोन बटणं दाबण्याचा अवकाश आपली स्क्रीन लॉक होते. यात आपल्याला पासवर्डही सेट करता येतो. त्यामुळे आपलं काम इतरांना कळू न देण्यासाठीही याचा उपयोग होतो.

* त्याच बरोबर आपल्या कम्प्युटरमधल्या टेंपररी फाईल डिलीट करणं खुप गरजेचं असतं. त्यासाठी 'विण्डोज बटण आणि एफ' दाबुन थेट सर्च विण्डो ओपन करावी. नंतर *.tmp टाईप करा. येणार्‍या फाईल डिलीट करा. यामुळे कम्प्युटरमधील नको असलेल्या फाईल काढून टाकून जागा मोकळी करता येते.

Sunday, February 15, 2009

Valentine Day…or Violence Day

आजच्या पेपरमधल्या बातम्या वाचुन खुप राग, फ्रस्ट्रेशन आलं असं वाटायला लागलं. त्या headlines मध्ये होतं व्हायोलन्स डे!... 'हे तर हिंदू तालिबानीकरण!'. कालच्या 'व्हॅलंटाइन डे' निमित्ताने देशभरातल्या तथाकथित संस्कॄती रक्षकांनी महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत यथेच्छ घातलेला गोंधळ. हा गोंधळ नक्की कशासाठीचा होता? असा गोंधळ घातल्याने खरंच आपली संस्कृती वाचते का? पुण्यात झालेला जबरदस्तीने प्रेमी युगुलांना फुलांच्या मुंडावळ्या बांधून, एकमेकांना हार घालायला लावून प्रतिकात्मक लग्न लावण्याचा प्रकाराने नक्की काय साधायचं होतं? एखादा मुलगा आपल्या संघटनेने घातलेली बंदी झुगारुन व्हॅलंटाइन डे साजरा करण्याचा प्रयत्न करतो म्हणुन त्याचं चक्क गाढविणीशी लावून देण्याचा जो प्रकार काल मिरजेत घडला तो खरंच संस्कृती रक्षणाचा प्रयत्न होता का? या अशा जबरदस्तीची लग्न लावुन, तरुणाचे लग्न चक्क गाढविणीशी लावून खरंच आपली संस्कृती वाचते का? आपली संस्कृती खरंच इतकी तकलादू असते का? या निमित्ताने एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायला हवी की, या सर्व घडामोडी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विविध भागात घडत असताना मुंबई मात्र तशी शांतच होती. या वेळी मुंबई शांत राहण्यामागे लवकरच येऊ घातलेल्या निवडणूका हे असू शकतं. शहरातल्या तरुण वर्गाला दुखवणं हे शिवसेनेसारख्या पक्षाला परवडणारं नाही हे या पक्षाचे नेते जाणून होते. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो त्या ठाण्यातही कुठेही व्हॅलंटाइन डेला गालबोट लागलं नाही. पण त्याचवेळी राष्ट्रवादीने तथाकथित हिंदुत्ववादी संघटनांचे हे प्रकार म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद असल्याचा आरोप करत हा दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची भूमिका मांडली. ठाण्यात आमदार जितेंद आव्हाड यांनी चक्क व्हॅलण्टाइन कार्ड्स आणि गिफ्ट्सचं दुकानच थाटलं. परंतु, हे प्रकार म्हणजे राजकीय पक्षांनी चालवलेले पब्लिसिटी स्टंट आहेत हे न कळण्याइतकं कोणीही मूर्ख नाही हे बहूधा राजकीय पक्षांची मंडळी विसरली असावीत. कोणते सण उत्सव कोणी साजरे करावेत या बाबत निर्णय घेण्याचा अधिकार कोण्त्याही राजकीय पक्षांना किंवा तथाकथित संस्कॄती रक्षकांना नाही हे त्यांच्या लक्षात आणून देण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

कपिल चव्हाण
१५.०२.२००९

Sunday, February 8, 2009

श्रद्धा आणि अंधश्रद्धा

मला रविवारी ऑफिसला यायला किंवा कुठेही बाहेर जायला खुप आवडत कारण ट्रेनला असणारी कमी गर्दी. पण आजचा रविवार मात्र तसा नव्हता म्हणजे गर्दी तशी कमीच होती. माझा बाजूला एक माणुस त्याच्या लहान मुलाला घेउन बसला होता. तितक्यात त्यांच्या परिचयातला एक माणुस त्यांच्या समोर येउन बसला. त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. गप्पांचा ओघ सुरुवातीपासूनच एका बापूंकडे होता. ते दोघही त्या बापुंचे भक्त होते. त्यांच्यापैकी एकाने आपल्या शर्टाच्या खिशाजवल त्या बापुंचा फोटो लावला होता. थोड्यावेळाने माझ्या बाजूला बसलेल्या माणसाने आपल्या मुलाला बापुंची भजन आणि इतर आरत्या कशा येतात याचं कौतुक सांगायला लागला. एवढ्यावरंच त्याच समाधान झालं नाही. मग त्याला त्या आरत्या त्या २ वर्षांच्या लहान मुलाकडून गाउन घेण्याची हुक्की आली. पण ते लहान मूल काही बधलं नाही. ते मूल आपल्या बालसुलभ निरीक्षणं करण्यात व्यस्त होतं. तो माणुस परत परत त्याला त्या आरत्या म्हनण्यासाठी प्रवृत्त करत होता. पण त्या मुलाने शेवटपर्यंत ऐकल नाही. त्या लहान मुलाने केलेल्या फजीती नंतर त्यांनी आपली चर्चा बापूंनी लिहिलेल्या नव्या लेखाकडे वलवली. त्या लेखात त्या बापूंनी अशी भविष्यवाणी केली आहे की, २०१२ साली तिसरं महायुध होणार आहे आणि जे त्यांची उपासना करत असतील त्यांना काही होणार नाही. या सर्वांवर कोटि करणारी काही विधानं हे दोन भक्त करत होते. एक जण म्हणाला की बापू हा साईं बाबांचा नवा अवतार आहे. जसं साईं बाबा गेल्यावर खुप जनाना पश्चाताप झाला तशी संधी बापू जिवंत असताना देतील जे ही संधी स्वीकारतील ते या महायुधातुन वाचतील. तोड्यावेळात त्यांचं स्टेशन आल्यावर ते उतरून गेले आणि माझ्या मनात बरेच विचार मात्र मागे उरले.

एखादा माणुस खरंच देवत्त्वाच्या रेषेपर्यंत जाऊ शकतो का?

जो माणुस देवत्त्वाच्या रेषेपर्यंत पोहोचला आहे तो आपल्या भक्तांना किंवा अनुयायांना फक्त माझी भक्ति कराल तरच वाचाल अशी शिकवण देऊ शकतो का?

कुठ्चाही देव राग अथवा लोभ मनात ठेउन मानसांना वाचवतो का? जर तसं असेल तर त्याला देव का म्हणायचं? ( कारण माणसामधेही राग-लोभ असतात आणि त्याच कारणाने ते एखाद्याचं भलं किंवा नुकसान करत असतात. )

या बाबत तुमची असणारी मतं मला सांगायला विसरु नका.

- कपिल चव्हाण

Thursday, January 1, 2009

प्रश्न...प्रश्न ...प्रश्न आणि फक्त प्रश्नच

आजच्या या परिस्थितीत माझ्या मनात कायम काही प्रश्न उभे राहतात। त्या प्रश्नांची उत्तर मला अजूनपर्यंत मिळालेली नाहीत। पण मी त्या प्रश्नांचा शोध मात्र थाम्बवलेला नाही।

मी मुम्बैकर आहे पण ते होण्यासाठी मी काय केले?
मी मराठा आहेस म्हणजे नक्की काय आहेस?
मी हिंदू आहेस म्हणजे नक्की काय आहेस?
बाबरी मशीद का पाडली?