- रन कमाण्डमधे जाऊन आपण अनेक प्रोग्राम रन करतो। त्यासाठी स्टार्ट-रन असा लाँगकट वापरण्यापेक्षा फक्त विण्डोज बटण आणि आर दाबायचं की, रनची विण्डो उघडते.
- जो डेटा आपल्यासाठी मस्ट आहे, त्याचा बॅकअप ठेवावा. त्यासाठी तो एकाच ठिकाणी न ठेवता हार्डडिस्क, सीडी, पेन ड्राइव अशा वेगवेगळ्या ठिकाणी सेव करता येतो.
- महत्त्वाचा डेटा अर्थात, वर्ड, एक्सेल, प्रेझेण्टेशन, गाणी, गेम्स, सिनेमा यांच्या फाइल्सपैकी ज्या फाइल आवश्यक आहेत तेवढ्याच 'हार्डडिस्क'मधे ठेवा. बाकीच्या फाइल सरळ डिलिट करा. नको असलेले प्रोग्राम काढून टाका. यामुळे व्हायरसची शक्यता कमी होते.
- ज्या फाइल हव्या आहेत, पण कधीतरीच वापरणार, त्या सीडी, डीव्हीडी, पेन ड्राइव किंवा एक्स्टर्नल हार्डडिस्कमधे टाकून ठेवा.
- मदतीने आपण एखाद्या र्सव्हरवर डेटा सुरक्षित ठेवू शकतो त्यासाठी 'गुगल डॉक्स' ही सेवा वापरता येईल. आपल्या जीमेल पासवर्ड वापरून जगाच्या पाठीवर कुठेही इण्टरनेटच्या मदतीने 'गुगल डॉक्स'मधे डेटा स्टोअर करता येतो.
- डेटा कम्युटरवर ठेवायचा आहे, त्याची व्यवस्थित विभागणी करा. त्यासाठी सी ड्राइवमधे पाटिर्शन करून किमान आणखी एक ड्राइव तयार करा. त्याला नाव द्या. 'सी'मधे प्रोग्राम आणि बाकीचा डेटा फाइल पाटिर्शन करून नव्याने तयार केलेल्या ड्राइवमधे टाका. त्यामुळे हार्ड डिस्क क्रॅश झाली अथवा काही कारणामुळे फॉरमॅट करावी लागली, तर फक्त नव्याने प्रोग्राम इन्स्टॉल करावे लागतील. तुमच्या डेटाचं नुकसान होणार नाही.
Sunday, July 19, 2009
थोड्स कंप्यूटर विषयी ...भाग 2
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment